पान:रामदासवचनामृत.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

INnar रामदासवचनामृत-दासबोध. $ ५.०० कामापासून सुटला । क्रोधापासूनि पळाला। मदमत्सर सांडिला । एकीकडे ॥ ३५ ॥ कुळाभिमानासि सांडिलें । लोकलाजेस लाजविलें । परमार्थास माजविलें । विरक्तिवळें ॥ ३६॥ अविद्येपासून फडकला । प्रपंचापासून निष्टला . लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७॥ थोरपणासि पाडिलें । वैभवासि लिथाडिलें। महत्वासि झिंजोडिलें । विरक्तिबळें ॥ ३८॥ भेदाचा मडघा मोडिला। अहंकार सोडूनि पाडिला । पाई धरूनि आपटिला । संदेहशत्रु ॥ ३९ ॥ विकल्पाचा केला वधु । थापें मारिला भवसिंधु । सकळ भूतांचा विरोधु । तोडून टाकिला ॥ ४०॥ भवभयासि भडकाविलें । काळाचें टांगे मोडिलें। मस्तक हाणोनि फोडिलें । जन्ममृत्याचें ॥४१॥ अभ्यासाचा संग धरिला। साक्षपासरिसा निघाला। प्रेत्न सांगाती भला । साधनपंथें ॥ ५५ ॥ दा. ५. ९. ३-५५.. ५८. सख्यभक्तिनिरूपण. मागां जालें निरूपण । सातवे भक्तीचे लक्षण । आतां ऐका सावधान । आठवी भक्ती ॥१॥ देवासी परमसख्य करावें । प्रेम प्रीतीने बांधावें। आठवे भक्तीचे जाणावें । लक्षण ऐसें ॥२॥ १ निराळा झाला. २ निसटला. ३ फेंकून दिले. ४ प्रयत्न,