पान:रामदासवचनामृत.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९९ ५७] साक्षात्कार. परती सारून उपाधी । असाध्य वस्तु साधने साधी। स्वरूपी करी दृढबुद्धि । या नांव साधक ॥ २३ ।। देवाभक्तांचे मूळ । शोधून पाहे सकळ । साध्यचि होये तत्काळ । या नांव साधक ॥ २४ ॥ विवेकबळे गुप्त जाला । आ–आप मावळला। दिसतो परी देखिला । नाहींच कोणी ॥ २५ ॥ मीपण मागे सांडिलें । स्वयें आपणांस धुंडिलें। तुर्येसहि वोलांडिलें । या नांव साधक ॥ २६ ॥ पुढे उन्मनीचा शेवटीं । आपली आपण अखंड भेटी। अखंड अनुभवी ज्याची दृष्टी । या नांव साधक ॥ २७॥ द्वैताचा तटको तोडिला । भासाचा भास मोडिला। देही असोनि विदेह झाला । या नांव साधक ॥ २८ ॥ जयास अखंड स्वरूपस्थिती । नाहीं देहाची अहंकृती। सकळ संदेहनिवृत्ती। या नांव साधक ॥ २९ ॥ पंचभूतांचा विस्तार । जयासि वाटे स्वनाकार । निर्गुणी जयाचा निर्धार । या नांव साधक ॥ ३०॥ . स्वप्नी भये जे वाटलें । तें जागृतीस नाहीं आलें। सकळ मिथ्या निर्धारिलें । या नांव साधक ॥ ३१ ॥ निद्रा सांडूनि चेइरो जाला । तो स्वमभयापासून सुटला। माया सांडून तैसा गेला। साधक स्वरूपी ॥ ३३ ॥ ऐसी अंतरस्थिती बाणली। बाद्य निस्पृहता अवलंबिली। संसारउपाधी त्यागिली। या नांव साधक ॥ ३४॥ १ संबंध. २ जागा.