या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८
[§५७
रामदासवचनामृत-दासबोध.
आत्मज्ञान जीर्ण जर्जर । त्याचा करी जीर्णोद्धार ।
विवेके पावे पैलपार । या नांव साधक ॥ ११ ॥
उत्तमें साधूची लक्षणे । अंगिकारी निरूपणें ।
बळेचि स्वरूपाकार होणे । या नांव साधक ॥ १२ ॥
असत्क्रिया ते सोडिली । आणी सत्क्रिया ते वाढविली ।
स्वरूपस्थिती बळावली । या नांव साधक ॥ १३ ॥
अवगुण त्यागी दिवसेंदिवस । करी उत्तम गुणाचा अभ्यास ।
स्वरूपी लावी निजध्यास । या नांव साधक ॥ १४ ॥
दृढनिश्चयोचनि बळें । दृश्य असतांच नाडळे ।
सदा स्वरूपी मिसळे । या नांव साधक ॥ १५ ॥
प्रत्यक्ष माया अलक्ष करी । अलक्ष वस्तु लक्षी अंतरीं ।
आत्मस्थितीची धारणा धरी । या नांव साधक ॥ १६ ॥
जें या जनासि चोरलें । मनास न वचे अनुमानलें ।
तेंचि जेणे दृढ केलें । या नांव साधक ॥ १७ ॥
जें बोलतांचि वाचा धरी । जे पाहातांचि अंध करी ।
तें साधी नानापरी । या नांव साधक ॥ १८ ॥
जे साधूं जातां साधवेना । जें लक्षू जातां लक्षवेना ।
तेंचि अनुभवे आणी मना । या नांव साधक ॥ १९ ॥
जेथें मनचि मावळे । जेथें तर्कचि पांगुळे ।
तेंचि अनुभवा आणी बळें । या नांव साधक ॥ २० ॥
स्वानुभवाचेनि योगें । वस्तु साधी लागवेगें ।
तेचि वस्तु होये आंगें । या नांव साधक ॥ २१ ॥
अनुभवाची आंगे जाणे । योगियांचे खुणे बाणे ।
कांहींच न होन असणे । या नांव साधक ॥ २२ ॥