पान:रामदासवचनामृत.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५.] साक्षात्कार. प्रत्ययेविण साभिमान । रोगी मारिले झांकून। तेथे अवघाचि अनुमान । ज्ञान कैंचें ॥४८॥ सर्व साभिमान सांडावा । प्रत्ययें विवेक मांडावा । • मायापूर्वपक्ष खंडावा । विवेकवळें ॥४९॥ दा. १४. ८. २४-४९. ६७. साधकलक्षण. जो संतांसी शरण गेला । संतजनी आश्वासिला। मग तो साधक बोलिला। ग्रंथांतरीं ॥ ३॥ उपदेशिले आत्मज्ञान । तुटले संसारबंधन। दृढतकारणे करी साधन । या नांव साधक ॥४॥ धरी श्रवणाची आवडी । अद्वैतनिरूपणाची गोडी। मननें अर्थातर काढी। या नांव साधक ॥ ५ ॥ होतां सारासारविचार । ऐके होऊनि तत्पर । संदेह छेदूनि दृढोत्तरं । आत्मज्ञान पाहे ॥६॥ नानासंदेहनिवृत्ती। व्हावया धरी सत्संगती। आत्मशास्त्रगुरुप्रचीती । ऐक्यतेसि आणी ॥ ७॥ देहबुद्धि विवेकें वारी । आत्मबुद्धि सहढ धरी। श्रवण मनन केलेंचि करी। या नांव साधक ॥ ८॥ विसंचूंनि दृश्यभान । दृढ धरी आत्मज्ञान । विचारें राखे समाधान । या नांव साधक ॥९॥ तोडूनि द्वैताची उपाधी । अद्वैत वस्तु साधने साधी । लावी ऐक्यतेची समाधी। या नांव साधक ॥१०॥ .. १ दृढतर. २ नाहीसे करून. STOT - -