पान:रामदासवचनामृत.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत दासबोध. [$ ५६ अखंड ध्याने न घडे हित । तरी तो जाणावा पतित । हाचि अर्थ सावचित । बरा पाहावा ॥ ३७ ॥ ध्यान धरितें तें कोण । ध्यानी आठवतें तें कोण। दोनीमधे अनन्यलक्षण । आसिल पाहिजे ॥ ३८ ॥ अनन्य सहजचि आहे । साधक शोधून न पाहे । ज्ञानी तो विवरोन राहे । समाधानें ॥ ३९॥ ऐसी हे प्रत्ययाची कामें । प्रत्ययेविण बाधिजे भ्रमें। लोकदंडकसंभ्रमें । चालती प्राणी ॥ ४०॥ दंडकध्यानाचे लक्षण । धरून बैसलें अवलक्षण । प्रमाण आणी अप्रमाण । बाजारी नेणती ॥४१॥ मिथ्या समाचार उठविती । वाउग्याच बोंबा घालिती। मनास आणितां अंतीं । आवघेचि मिथ्या ॥४२॥ कोणीयेक ध्यानस्त बैसला । कोणी येक सिकवी त्याला मुकुट काढोनि माळ घाला । म्हणजे बरें॥४३॥ मनाचेथे काये दुष्काळ । जे आखुड कल्पिली माळ । सांगते ऐकते केवळ । मूर्ख जाणावे ॥४४॥ प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती। दोरे फुलें गुंफावी न लगती। कल्पनेचि माळ थिटी करिती । काये निमित्य ॥ ४५ ॥ बुद्धीविण प्राणी सकळ । ते ते अवघेचि बाष्कळ । तया मूर्खासी खळखळ । कोणे करावी ॥४६॥ जेणें जैसा परमार्थ केला । तेसाचि'पृथ्वीवरि दंडक चालिला। साता पांचाचा बळावला । साभिमान ॥४७॥ - - १ बाजारबुणगे. २ कोटी, लहान. ३ गलबला.