पान:रामदासवचनामृत.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना ल्याने आजपर्यंत शके १५७१ मध्ये रामदासांनी शिवाजीस अनुग्रह दिला असें जें मत प्रचलित आहे ते खोटे ठरते. ५. याच्या विरुद्ध रा. देव व राजवाडे यांचे म्हणणे असे आहे की ज्यां पत्रांवर रा. भाटे व चांदोरकर यांची भिस्त आहे ती पत्रे अस्सल नसून नक्कल आहेत. व शिवाय त्यांत जे शक लिहिले आहेत ते स्पष्ट नाहीत, अगर त्यांत हस्तदोष आहे. शिवाय ती पत्रे अस्सल आहेत असे जरी धरून चाललें तरी त्या पत्रांचा अर्थ दुसऱ्या रीतीने लावतां येण्यासारखा आहे. (१) पहिल्या पत्रांत शिवाजी राजे यांची पहिलीच भेट आहे असा जो उल्लेख आहे तो रामदासांच्या भेटीविषयी नसून शिवाजीने चाफळ येथील मठास शके १५९४ मध्ये जी भेट दिली तीस अनुलक्षून आहे. रा. दत्तोपंत आपटे यांनी ही सूचना पुढे मांडली आहे. या सूचनेस दुजोरा म्हणून वरील पत्र लिहिल्यावर चारच महिन्यांनी शिवाजी राजे यांनी दत्ताजीपंत वाकेनिवीस यांस जें पत्र लिहिले आहे त्यांत 'चाफल येथे रामदास गोसावी आहेत. श्रीचे देवालय केले आहे...तथ कटकीचे सिपाही लोक व बाजे लोक राहताती...चोरा चिरटियाही उपद्रव होउ न दणे' असा जो उल्लेख आहे तो शिवाजी राजे यांनी चाफळमठास शके १५९४ साली भेट दिली त्यानंतरचा आहे. ( २) रा. भाटे व चांदोरकर यांच्या. दुसऱ्या मुद्यांत भास्कर गोसावी यांशी बोलतांना शिवाजी राजे यांनी हे रामदासांचेच खरे शिण्य आहेत किंवा नाहीत याची परीक्षा पाहण्याकरितांच त्यांस प्रश्न केला असावा असें रा. देव व राजवाडे यांचे म्हणणे आहे. (३) रा. भाटे व चांदोरकर यांच्या तिसऱ्या मुद्यांत दिवाकर गोसावी यांची जी दोन पत्रे उद्धृत केली आहेत त्यांत परिधावी संवत्सरी परमार्थाचा उल्लेख मुळामध्ये केला गेला नसून त्यांच्या ताजाकलमांत केला आहे, म्हणून तो मुळाइतका विश्वसनीय नाही. शिवाय, जरी शके १५७१ मध्ये प्रथम रामदासांचा शिवाजीस अनुग्रह झाला असला, तथापि त्याची पुनरा वृत्ति शके १५९४ मध्ये झाली असण्याचा संभव आहे. • ६. याशिवाय प्रो. भाटे व चांदोरकर यांच्या मताविरुद्ध दोन तीन कारणे आहेत त्यांचाही येथे उल्लेख केला पाहिजे. (४) रामदास शिवाजीचे केवळ 'मोक्षगुरु किंवा धर्मगुरु ' होते व त्यांचे मूळपासून राजकारणाकडे लक्ष नव्हतें