पान:रामदासवचनामृत.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत . प्रकरणांत दिल्याप्रमाणे रामदासांनी शिवाजीस शके १५७१ या साली अनुग्रह दिला.. हे मत वाकेनिशीप्रकरण व हनुमंत स्वामींची बखर यांच्या बरहुकम असून रा. देव व राजवाडे यांस तें अभिप्रेत आहे. याच्या विरुद्ध मताचे प्रतिपादन प्रो. भाटे व चांदोरकर यांनी केले आहे. या मताप्रमाणे शिवाजीस रामदासांनी शके १५९४ मध्ये अनुग्रह दिला. या दोन मतांमध्ये दक्षिण व उत्तर ध्रुव यांइतकें अंतर आहे हे उघडच दिसत आहे. रा. देव व राजवाडे यांचे मत खरे असल्यास शिवाजीच्या कारकीर्दीच्या अव्वलपासूनच रामदासांचे शिवाजविर पारमार्थिक वर्चस्व असल्याने शिवाजीचा राज्यविस्तार बहुशः रामदासांच्या नेतृत्वाखाली झाला असला पाहिजे. याच्या उलट रा. भाटे व चांदोरकर यांचे मत खरे असल्यास रामदासांचे शिवाजीवर वर्चस्व शिवाजीच्या कारकीर्दीच्या अखेरीसच प्रस्था-. पित झाले असल्याने शिवाजीस रामदासांपासून राज्यस्थापनेची स्फूर्ति मिळाली हे म्हणणे फोल होते. ही मतें इतकी परस्परविरोधी आहेत की त्यांतून मार्ग काढणे कठीण आहे. शिवाय दोहींकडे कागदपत्रांचा पुरावा असल्याने दोन्ही मते जणू काय अभेद्यच आहेत अशी वाटतात. तथापि तारतम्य बुद्धीने यांतील कोणते ग्राह्य आहे याचा आपण थोडक्यांत येथे विचार करूं. .४. भाटे व चांदोरकर यांच्या मताप्रमाणे (१) केशव गोसावी यांनी दिवाकर गोसावी यांस शके १५९४ मध्ये जे पत्र लिहिले आहे त्यांत 'राजे यांची पहि-. लीच भेट आहे. वाडीचे लोकास खटपटस अणावे...झाडी बहुत आहे ' असा उल्लेख आहे. तसेंच ( २ ) शके १५८० मध्ये भास्कर गोसावी यांनी दिवाकर गोसावी यांस में पत्र लिहिले आहे त्यांत. त्यांनी शिवाजी राजे यांच्याकडे भिक्षेस गेलो...आम्ही बोललो की आम्ही रामदासी. श्रीसमर्थांचे शिष्य चाफळास हों. मग ते बोलले की ते कोठे राहतात व मुळ गांव कोण !' असा उल्लेख आहे. (३) याशिवाय ज्यांवर तारीख नाही अशी दिवाकर गोसावी यांची दोन पत्रे उपलब्ध आहेत. त्यांच्या ताजाकलमांत शिवाजीस शिंगणवाडी येथे परिधावी संवत्सरी परमार्थ झाला असा अनंत गोसावी व चिमा अक्का यांचा अनुक्रमें उल्लेख आहे. या मताप्रमाणे पाहिले असता रामदासांची व शिवाजीची भेट शके १५९४ मध्ये झाली, शके १५८० पर्यंत रामदास कोण होते हैं शिवाजीस माहीतही नव्हते, व परिधावी संवत्सर शके १५९४ मध्ये पडत अस--