पान:रामदासवचनामृत.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत असे म्हणून चालावयाचें नाही. आम्ही उद्धत केलेल्या दासबोधांतील ज्यांत तुळजाभवानीचा उल्लेख आहे अशा पहिल्या उता-यावरून, शिवाय रामदासांनी तुळजादेवीस " तुझा तूं वाढवी राजा । सीघ्र आम्हांचि देखतां" (क्र. ११२) या उता-यावरून, व शिवाय आनंदवनभुवन ( क्र. ११६ ) या सर्व उताऱ्यांवरून रामदासांचे राजकारणाकडे मूळपासून लक्ष नव्हते असे म्हणणे चुकीचे होईल. शिवाय शके १५८३ मध्ये प्रतापगडावर तुळजाभवानीची स्थापना रामदास यांच्याकडूनच झाली असल्याबद्दलचा पुरावाही आहे ही गोष्ट ध्यानांत ठेविली पाहिजे. (५) संभाजी याने रामदासांचे शिष्य वासुदेवगोसावी यांस शके १६०२ मध्ये जी सनद दिली आहे त्यांत चंद्र पंचवीस, जिल्हेज, सन इहिदे सबईन अलफ म्हणजे शके १५९३ मध्ये शिवाजीने वासुदेव गोसावी यांस दिलेल्या सनदेचा उल्लेख केला आहे. हा शक शके १५९४ च्या पूर्वीचा असल्याने रामदासांस मात्र शिवाजी शके १५९४ पर्यंत ओळखीत नाहीत व त्यांचे शिष्य वासुदेवगोसावी यांस शके १५९३ मध्ये सनद देण्याइतकें ओळखितात ही मोठ्या चमत्काराची गोष्ट आहे असें रा. देव यांनी म्हटले आहे. (६) परंतु आमच्या मते आतापर्यंत उपलब्ध असलेल्या पुराव्यांत शके १६०० आश्विन शुद्ध १० या रोजी शिवाजीने रामदासांस जी सनद करून दिली आहे ( क्र. ११५) ती सनदच सर्वांत श्रेष्ठ आहे असे म्हणण्यास हरकत नाही. या सनदेंत रामदासांनी चाफळास श्रीची स्थापना केल्यापासून म्हणजे शके १५७० पासूनच आपल्या व रामदासांच्या संबंधाचा जो साद्यंत वृत्तांत शिवाजीने लिहिला आहे त्यावरून रामदासांची व शिवाजीची भेट शके १५९४ मध्ये झाली या मतास गौणत्व येतें. (१) चाफळची स्थापना, (२) राजकारण व धर्मस्थापनेचा उपदेश, (3) संपादिलेल्या राज्याचें रामदासचरणों समर्पण, (४) राजकारणाचा पुनः उपदेश, (५) साम्राज्यप्राप्तीनंतर चाफळास इनाम, या सर्व गोष्टींचा उलगडा रामदासांचा शिवाजीशी शके १५९४ च्या अगोदर बरीच वर्षे संबंध आला असला पाहिजे असे मानल्यावांचन सुसंगत रीतीने होत नाही. तथापि आणखी काही ऐतिहासिक पुरावा बाहेर आल्यावर याबद्दल यापेक्षा अधिक निश्चित रतिीने लिहिता येईल. । ७. रामदासांच्या ग्रंथांपैकी दासबोध हा भक्तिग्रंथराज आहे असे म्हणण्यास हरकत नाही. रामदासांच्या वेळेसच या ग्रंथाच्या तीन वाढविलेल्या आवृत्त्या