या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
[§५४
रामदासवचनामृत-दासबोध.
कल्पनेने कल्पना सरे । ऐसी जाणावी चतुरें ।
सबळ गेलिया नंतरें । शुद्ध उरली ॥ ३८ ॥
दा. ७. ५. २१-३८.
५५. "निर्विकल्पास कल्यावें । कल्पना मोडे स्वभावें."
असो ऐसें जें शाश्वत ब्रह्म । जेथें नाहीं मायाभ्रम ।
अनुभवी जाणे वर्म । स्वानुभवें ॥४७ ॥
आपुलेन अनुभवें । कल्पनेसि मोडावें ।
मग सुकाळी पडावें । अनुभवाचे ॥ ४८ ॥
निर्विकल्पास कल्पावें । कल्पना मोडे स्वभावें ।
मग नसोनि असावें । कल्पकोटी ॥ ४९ ॥
कल्पनेचें येक बरें । मोहरितांच मोहरे ।
स्वरूपी घालितां भरे । निर्विकल्पी ॥ ५० ॥
निर्विकल्पासी कल्पितां । कल्पनेची नुरे वार्ता ।
निःसंगास भेटों जातां । निःसंग होइजे ॥ ५१ ॥
पदार्था ऐसें ब्रह्म नव्हे । मा तें हाती धरोनि द्यावें ।
असो हे अनुभवावें । सद्गुरुमुखें ॥ ५२ ॥
दा. ७. ३. ४७-५२.
५६. खोटें ध्यान व खरें ध्यान.
अखंड ध्यानाचे लक्षण । अखंड देवाचे स्मरण ।
याचे कळतां विवरण । सहजचि घडे ॥ २४ ॥
सहज सांडून सायास । हाचि कोणीयेक दोष ।
आत्मा सांडून अनात्म्यास । ध्यानी धरिती ॥ २५ ॥
याचे कळतां विवरण । सहजचि घडे ॥ २४ ॥
सहज सांडून सायास । हाचि कोणीयेक दोष ।
आत्मा सांडून अनात्म्यास । ध्यानी धरिती ॥ २५ ॥