पान:रामदासवचनामृत.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५] साक्षात्कार. श्रवण आणि मनन । निजध्यासें समाधान। मिथ्या कल्पनेचे भान । उडान जाये ॥ २७॥ शुद्ध ब्रह्माचा निश्चयो । करी कल्पनेचा जयो।। निश्चितार्थे संशयो । तुटोन गेला ॥२८॥ मिथ्या कल्पनेचे कोडें । कैसे राहे साचापुढें। जैसे सूर्याचेनि उजेडें । नासे तम ॥ २९॥ तैसें ज्ञानाचेनि प्रकाशें । मिथ्या कल्पना हे नासे। मग तुटे अपैसें । द्वैतानुसंधान ॥ ३० ॥ कल्पनने कल्पना उडे । जैसा मृगें मृग सांपडे । कां शरें शर आंतुडे । आकाशमार्गी ॥ ३१॥ शुद्ध कल्पनेचे बळ । जालियां नासे सबळे । होंच वचन प्रांजळ । सावध ऐका ॥ ३२॥ शुद्ध कल्पनेची खूण । स्वयें कल्पिजे निर्गुण । सस्वरूपी विस्मरण । पडोंचि नेदी ॥ ३३॥ सदा स्वरूपानुसंधान । करी द्वैताचे निर्शन । अद्वयनिश्चयाचे ज्ञान । तेचि शुद्ध कल्पना ॥ ३४॥ अद्वैत कल्पी ते शुद्ध । द्वैत कल्पी ते अशुद्ध । अबुद्ध तेचि प्रसिद्ध । सबळ जाणावी ॥ ३५॥ शुद्ध कल्पनेचा अर्थ । अद्वैताचा निश्चितार्थ । आणी संबळ वेथ । द्वैत कल्पी॥ ३६॥ अद्वैतकल्पना प्रकाशे । तेचि क्षणी द्वैत नासे। द्वैतासरिसी निरसे। प्रबळं कल्पना ॥ ३७॥ AC १ आपाआप. २ सांपडेतो. ३ शबल, ४ स्वस्वरूपी. ५ निरसन, निवारण. SHA