पान:रामदासवचनामृत.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध.. [७५३ ऐसा भगवंती रंगला । आणीक कांहीं नलगे त्याला। स्वइच्छा वर्गी लागला । ध्यान कीर्ति प्रताप ॥ ३१॥ नाना ध्याने नाना मूर्ती । नाना प्रताप नाना कीर्ती। तयापुढे नरस्तुती । त्रुणतुल्य वाटे ॥ ३२ ॥ असो ऐसा भगवद्भक्त । जो ये संसारीं विरक्त । तयास मानिती मुक्त । साधुजन ॥ ३३ ॥ त्याचे भक्तीचे कौतुक । तया नांव प्रसादिक । सहज बोलतां विवेक । प्रगट होये ॥ ३४॥ दा. १४. ३. २२-३४. ५४. कल्पना कशी मोडावी? कल्पना अंतरी सबळ । नस्ते दावी ब्रह्मगोळ। क्षणा येकातें निर्मळ । स्वरूप कल्पी ॥ २१॥ क्षणा येका धोका वाहे । क्षणा येका स्थिर राहे। क्षणा येका पाहे । विस्मित होउनि ॥ २२ ॥ क्षणा येकातें उमजे। क्षणा येकातें निर्बुजे। नाना विकार करिजे । ते कल्पना जाणावी ॥ २३ ॥ कल्पना जन्माचें मूळ । कल्पना भक्तीचे फळ । कल्पना तेचि केवळ । मोक्षदाती ॥ २४ ॥ असो ऐसी हे कल्पना । साधनें दे समाधाना। येरवी हे पतना। मूळच कीं ॥२५॥ म्हणोन सर्वांचे मूळ । ते हे कल्पनाच केवळ । इचें केलिया निर्मूळ । ब्रह्मप्राप्ती ॥ २६ ॥ १ समजत नाही.