पान:रामदासवचनामृत.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२] साक्षात्कार. जेथें नाहीं नित्यश्रवण । ते जाणावें विलक्षण । तेथें साधकें येक क्षण । कमूं नये सर्वथा ॥४४॥ जेथें नाहीं श्रवणस्वार्थ । तेथें कैंचा हो परमार्थ। मागें केलें तितुकें वेर्थ । श्रवणेंविण होये ॥ ४५ ॥ तस्मात् श्रवण करावें । साधन मनीं धरावें। नित्यनेमें तरावें । संसारसागरीं ॥४६॥ सेविलेंच सेवावें अन्न । घेतलेंचि घ्यावे जीवन। तैसें श्रवण मनन । केलेंचि करावें॥ ४७॥ श्रवणाचा अनादर । आळसें करी जो नर। त्याचा होये अपहार । स्वहितविषई ॥४८॥ आळसाचे संरक्षण । परमार्थाची बुडवण । याकारणे श्रवण । केलेंचि पाहिजे ॥४९॥. आतां श्रवण कैसे करावें । कोण्या ग्रंथास पहावें। पुढिले समासीं आघवे । सांगिजेल ॥५०॥ दा. ७. ८. ५२. "निःशंक निर्लज कीर्तन । करितां रंग माने." श्रृंघारिक नवरसिक । यामधे सांडावें येक । स्त्रियादिकांचे कौतुक । वणू नये कीं ॥ २१॥ लावण्य स्त्रियांचें वर्णितां । विकार बाधे तत्वतां। धारिष्टापासून श्रोता । चळे तत्काळ ॥ २२ ॥ म्हणऊन तें तजावें । जें बाधक साधका स्वभावें। घेतां अंतरीं ठसावें। ध्यान स्त्रियांचें ॥ २३॥ लावण्य स्त्रियांचें ध्यान । कामाकार जालें मन। कैचें आठवेल ध्यान । ईश्वराचें ॥ २४॥