Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
[§५२
रामदासवचनामृत-दासबोध.
स्त्री वर्णितां सुखावला । लावण्याचे भरी भरला ।
तो स्वयें जाणावा चेवला । ईश्वरापासुनी ॥ २५ ॥
हरिकथेसी भावबळें । गेला रंग तो तुंबळे[]
निमिष्य येक जरी आकळे । ध्यानी परमात्मा ॥ २६ ॥
ध्यानी गुंतले मन । कैचें आठवेल जन ।
निःशंक निर्लज्ज कीर्तन । करितां रंग माजे ॥ २७ ॥
रागज्ञान ताळज्ञान । स्वरज्ञानेंसी वित्पन्न ।
अर्थान्वयाचे कीर्तन । करूं जाणे ॥ २८ ॥
छपन्न भाषा नाना कळा । कंठ माधुर्य कोकिळा ।
परी तो भक्तिमार्ग वेगळा । भक्त जाणती ॥ २९ ॥
भक्तांस देवाचें ध्यान । देवावांचून नेणे अन्न[]
कळावंतांचे जे मन । ते कळाकार जालें ॥ ३० ॥
श्रीहरिवीण जे कळा । तेचि जाणाची अवकळा ।
देवास सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला ॥ ३१ ॥
सर्पी वेढिलें चंदनासी । निधानाआड विवसी[]
नाना कळा देवासी । आड तैशा ॥ ३२ ॥
सांडून देव सर्वज्ञ । नादामध्ये व्हावें मग्न ।
तें प्रत्यक्ष विघ्न । आडवें आलें ॥ ३३ ॥
येक मन गुंतलें स्वरी । कोणे चिंतावा श्रीहरी ।
बळेचि धरोनियां चोरीं । शिश्रूषा घेतली ॥ ३४ ॥
करितां देवाचे दर्शन । आडवें आलें रागज्ञान ।
तेणें धरूनियां मन । स्वरामागें नेलें ॥ ३५ ॥

  1. भरतो.
  2. अन्य
  3. भूत, हडळ.