पान:रामदासवचनामृत.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. साधकाचे होती सिद्ध । आंगी बाणतां प्रबोध । हे तो आहे प्रसिद्ध । सकळांस ठाउकें ॥ ३३ ॥ ठाईचे खळ चांडाळ । तेचि होती पुण्यसिळ। ऐसा गुण तत्काळ । श्रवणाचा ॥ ३४॥ जो दुर्बुद्धि दुरात्मा। तोचि होय पुण्यात्मा । अगाध श्रवणाचा महिमा । बोलिला न वचे॥ ३५ ॥ तीर्थी व्रतांची फळश्रुती। पुढे होणार सांगती। तैसें नव्हे हातीचा हातीं। सप्रचित श्रवण ॥ ३६ ॥ नाना रोग नाना व्याधी। तत्काळ तोडिजे औषधी। तैसी आहे श्रवणसिद्धी । अनुभवी जाणती ॥ ३७॥ श्रवणाचा विचार कळे । तरीच भाग्यश्री प्रगटे बळें । मुख्य परमात्माच आकळे । स्वानुभवासी ॥ ३८॥ या नांव जाणावें मनन । अर्थालागीं सावधान। निजध्यासें समाधान । होत असे ॥ ३९॥ बोलिल्याचा अर्थ कळे । तरीच समाधान निवळे। अकस्मात अंतरीं वोळे । निःसंदेहता ॥४०॥ संदेह जन्माचें मूळ । तें श्रवणे होये निर्मूळ । पुढे सहजचि प्रांजळ । समाधान ॥४१॥ जेथें नाहीं श्रवण मनन । तेथें कैचें समाधान । मुक्तपणाचे बंधन । जडलें पाई ॥ ४२ ॥ मुमुक्ष साधक अथवा सिद्ध । श्रवणेंविण तो अबद्ध। श्रवणमननें शुद्ध । चित्तवृत्ति होये ॥४३॥ १ बाणते.