पान:रामदासवचनामृत.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५१] साक्षात्कार, बहुत साधनें पाहातां । श्रवणास न घडे साम्यता। श्रवणेंविण तत्वतां । कार्य न चले ॥२१॥ न देखतां दिनकर। पडे अवघा अंधकार।.. श्रवणेंविण प्रकार तैसा होये ॥ २२॥ कैसी नवविधा भक्ती। कैसी चतुर्विधा मुक्ती। कैसी आहे सहजस्थिती। हं श्रवणविण न कळे ॥ २३॥ नकळे षट्कर्माचरण । न कळे कैसें पुरश्चरण। न कळे कैसें उपासन। विधियुक्त ॥२४॥ नाना व्रतें नाना दाने । नाना तपें नाना साधनें। नाना योग तीर्थाटणे। श्रवणेंविण न कळती ॥ २५ ॥ नाना विद्या पिंडज्ञान। नाना तत्त्वांचे शोधन। नाना कटा ब्रम्हज्ञान । श्रवणेंविण न कळे ॥२६॥ अठरा भार वनस्पती । येका जळे प्रबळती। .... एका रसें उत्पत्ती । सकळ जीवांची ॥२७॥ सकळ जीवां एक पृथ्वी । सकळ जीवां एक रवी। सकळ जीवां वर्तवी । येक वायो॥२८॥.. . सकळ जीवा येक पैस। जयास बोलिजे आकाश। सकळ जीवांचा वास । एका परब्रह्मीं ॥ २९ ॥ . तैसें सकळ जीवांस मिळोन । सार येकचि साधन। तें हे जाण श्रवण । प्राणिमात्रांसी ॥ ३० ॥ नाना देश भाषा मते । भूमंडळी असंख्यातें। सर्वीस श्रवणापरतें । साधनचि नाहीं ॥ ३१ ॥ श्रवणें घडे उपरती । बद्धाचे मुमुक्ष होती। मुमुक्षाचे साधक अती। नेमसिं चालता ॥ ३२ ॥