पान:रामदासवचनामृत.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- tan - रामदासवचनामृत-दासबोध. श्रवणे प्रबोध वाढे। श्रवणें प्रज्ञा चढे। श्रवणे विषयांचे वोढे । तुटोन जाती ॥ १०॥ . .. श्रवणे विचार कळे । श्रवणें ज्ञान हे प्रबळे। श्रवणें वस्तु निवळे । साधकासी ॥११॥ श्रवणे सद्बुद्धि लागे। श्रवणें विवेक जागे। श्रवणें मन हे मागे । भगवंतासी ॥ १२ ॥ श्रवणे कुसंग तुटे । श्रवणें काम वोहंटे। श्रवणे धोका आटे । येकसरां ॥१३॥ श्रवणें मोह नासे । श्रवणें स्फूर्ति प्रकाशे। श्रवणें सद्वस्तु भासे । निश्चयात्मक ॥ १४ ॥ श्रवणे होये उत्तम गती। श्रवणे आतुडे शांती। श्रवणे पाविजे निवृत्ती । अचळपद् ॥ १५॥ . श्रवणा ऐसें सार नाहीं । श्रवणें घडे सर्व काहीं। भवनदीचा प्रवाहीं । तरणोपाव श्रवणें ॥१६॥ श्रवण भजनाचा आरंभ। श्रवण सर्वां सर्वारंभ । श्रवणे होये स्वयंभ । सर्व कांहीं ॥ १७॥ प्रवृत्ती अथवा निवृत्ती । श्रवणेंविण न घडे प्राप्ती। हे तो सकळांस प्रचिती। प्रत्यक्ष आहे ॥ १८॥ : ऐकिल्याविण कळेना । हे ठाउके आहे जना। या कारणे मूळ प्रेत्ना । श्रवण आधीं ॥ १९॥ . जें जन्मीं ऐकिलचि नाहीं । तेथें पडिजे संदेहीं। म्हणोनियां दुजें कांहीं। साम्यता न घडे ॥२०॥ १ कमी होतो. २ एकदम. ३ आपोआप.