पान:रामदासवचनामृत.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना ho L w . शके १५९६ मध्ये शिवाजीस राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यावर शिवाजी दीड महिनापर्यंत सज्जनगडास येऊन राहिला, व त्याने तेथे बरीच रकम अन्नसंतर्पण, परमार्थकार्य, वगैरेत खर्च केली. शके १५९६ याच सालों हिवाळ्यांत समर्थ कोंकाणांमध्ये हेळवाकच्या घळीत होते. तेथे त्यांस कफाचा व तापाचा बराच विकार झाला. हेळवाकास रघुनाथभट यांनी समर्थीस बराच उपचार केला. रामदास चाफळाच्या उष्ण हवेत आल्यावर त्यांनी रघुनाथभट यांस स्वदस्तुरचे लिहिलेले पत्र उपलब्ध आहे (क्र. १०९). त्याचा उल्लेख पुढे येईलच. शके १५९९ मध्ये रामीरामदासांचा देहांत झाला. - शके १६०० त रामदासांनी राम, लक्ष्मण, व सीता यांच्या मूर्ती तंजावर मध्ये करावयास घातल्या. शके १६०० आश्विन शद्ध १० स म्हणजे दसऱ्याच्या दिवशी शिवाजीने रामदासांस करून दिलेली सनद अद्याप चालू आहे. ती पुढे दिलेलीच आहे. (क्र. ११५). शके १६०० रामदासांनी कल्याणांस डोमगांवों मठ करून राहण्यास सांगितले. ___ शके १६०१ पौष महिन्यांत शिवाजी महाराज रामदासांच्या भेटीस आले. ही भेट शेवटचीच होय असें रामदासांनी शिवाजीस सुचविले. यानंतर शिवाजी महाराज फार दिवस राहिले नाहीत. शके १६०२ चैत्रमासी शिवाजीचा अंत झाला, व संभाजी आपला अमात्य रामचंद्रपंत यांस घेऊन ज्येष्ठमासी रामदासांच्या दर्शनास आला, व तेथें आद दिवस राहिला. - शके १६०३ माघ शुद्ध १ स तंजावरहुन मूर्ति आल्या. माघ वद्य ५ समर्थांनी त्यांची स्थापना सज्जनगड येथे केली. हल्ली रामदासांच्या समाधीवर -सज्जनगड येथे ज्या मूर्ति दिसतात त्या याच होत. __ शके १६०३ माघ वद्य नवमी रोजी समर्थानी देह ठेविला. ... ३. वरील शकावलीत एका महत्त्वाच्या मुद्यासंबंधानें विद्वान् लोकांमध्ये वाद माजून राहिला आहे; तो मुद्दा म्हटला म्हणजे रामदासांनी शिवाजीस अनुग्रह केव्हां दिला यासंबंधी होय. आजपर्यंत प्रचलित असलेल्या मतांप्रमाणे वाकेनिशी