पान:रामदासवचनामृत.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- १५.] साक्षात्कार. म्हणोन निकाम भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान। तयास तुळितां त्रिभुवन । उणे वाटे ॥२५॥ येथे बुद्धीचा प्रकाश । आणीक न चढे विशेष । प्रताप कीर्ती आणी येश । निरंतर ॥ २६ ॥ दा. १०. ७. १९-२६. ५१. श्रवणनिरूपण. ऐका परमार्थाचे साधन । जेणे होये समाधान । तें तूं जाण गा श्रवण । निश्चयेंसीं ॥१॥ श्रवणे आतुडे भक्ती । श्रवणे उद्भवे विरक्ती। श्रवणें तुटे आसक्ती । विषयांची ॥२॥ श्रवणें घडे चित्तशुद्धी। श्रवणे होये दृढबुद्धी। श्रवणें तुटे उपाधी। अभिमानाची ॥३॥ श्रवणें निश्चयो घडे । श्रवणें ममता मोडे। श्रवणें अंतरीं जडे । समाधान ॥४॥ श्रवणें आशंका फिटे । श्रवणें संशय तुटे। श्रवण होतां पालटे । पूर्वगुण आपुला ॥५॥ श्रवणे आवरे मन । श्रवणें घडे समाधान । श्रवणें तुटे बंधन । देहबुद्धीचें ॥६॥ श्रवणें मीपण जाये । श्रवणे धोका नये । श्रवणें नाना अपाये । भस्म होती ॥७॥ 'श्रवणे होये कार्यसिद्धी। श्रवणे लागे समाधी। श्रवणें घडे सर्व सिद्धी । समाधानासी ॥८॥ सत्संगावरी श्रवण । तेणे कळे निरूपण। श्रवणे होईजे आपण । तदाकार ॥९॥


PAPES