पान:रामदासवचनामृत.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ८४ रामदासवचनामृत-दासबोध. [re कर्ता जगदीश है तो खरें। परी विभाग आला पृथकाकारें। तेथें अहंतेचे काविरें। बाधिजेना॥ २७॥ हरिदाता हरिभॊक्ता। ऐसे चालतें तत्त्वतां । ये गोष्टीचा आतां । विचार पहावा ॥ २८ ॥ सकळकर्ता परमेश्वरू। आपला माइक विचारू। जैसे कळेल तैसें करूं। जगदांतरें ॥२९॥ देवायेवढें चपळ नाहीं। ब्रह्मायेवढे निश्चळ नाहीं। पाइरीने पाइरी चढोन पाहीं। मूळपरियंत ॥३०॥ दा. २०. ४. २६-३०. ५०. ईश्वराबद्दल अहेतुक प्रेम. नि:काम बुद्धीचिया भजना। त्रैलोकीं नाहीं तुलना। सामथ्र्येविण घडेना। निःकाम भजन ॥१९॥ कामनेने फळ घडे। नि:काम भजनें भगवंत जोडे। . फळभगवंता कोणीकडे। महदांतर ॥२०॥ नाना फळे देवापासीं । आणी फळ अंतरी भगवंतासी। याकारणे परमेश्वरासी। निःकाम भजावें ॥ २१॥ . निःकाम भजनाचे फळ आगळें । सामर्थ्य चढे मर्यादेवेगळे । तेथे बापुडी फळें । कोणीकडे ॥२२॥ भक्तें जें मनीं धरावें । तें देवें आपणचि करावें। तेथे वेगळे भावावें । नलगे कदा ॥ २३॥ दोन्हीं सामर्थे येक होतां । काळास नाटोपे सर्वथा। तेथे इतरांची कोण कथा। कीटकन्यायें ॥ २४॥ १ वेड, भूतबधा.