Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§४९ ]
८३
साक्षात्कार.
४८. "उपासनेचा मोठा आश्रयो."

अगाध गुण भगवंताचे । शेष वर्णू न शके वाचे ।
वेदविधि तेहि काचे[] । देवेंविण ॥ २३ ॥
आत्माराम सकळां पाळी । अवधे त्रयलोक्य सांभाळी ।
तया येकविण धुळी । होये सर्वत्रांची ॥ २४ ॥
जेथें आत्माराम नाहीं । तेथें उरों न शके कांहीं ।
त्रयलोकींचे प्राणी सर्वही । प्रेतरूपी ॥ २५ ॥
आत्मा नस्तां येती मरणें । आत्म्याविण कैचे जिणें ।
बरा विवेक समजणे । अंतर्यामीं ॥ २६ ॥
समजणे जे विवेकाचें । तेंहि आत्म्याविण कैंचें ।
कोणीयेके जगदीशाचें । भजन करावें ॥ २७ ॥
उपासना प्रगट झाली । तरी[] हे विचारणा कळली ।
याकारणे पाहिजे केली । विचारणा देवाची ॥ २८ ॥
उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनेविण निराश्रयो ।
उदंड केले तरी तो जयो । प्राप्त नाहीं ॥ २९ ॥
समर्थाची नाही पाठी । तयास भलताच कुटी ।
याकारणे उठाउठी[] । भजन करावें ॥ ३० ॥
भजन साधन अभ्यास । येणे पाविजे परलोकास ।
दास म्हणे हा विश्वास । धरिला पाहिजे ॥ ३१ ॥

दा. १६.१०. २३-३१.

४९. "परंतु तेथे भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे."
सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथे भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ २६ ॥

  1. निरर्थक
  2. तरच.
  3. जलद.