पान:रामदासवचनामृत.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ . रामदासवचनामृत-दासबोध. [४७ नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेशी विश्वेश्वर । वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनाभेकरूनि ॥ १५ ॥...... उफराट्या नामासाठीं। बाल्मिक तरला उठाउठी।... भविष्य बदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥१६॥... हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला । नारायेणनामें पावन जाला । अजामेळ ॥ १७॥ ... नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले। .......... महापापी तेचि जाले । परम पवित्र ॥ १८॥ परमेश्वराची अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्यनेमें। . . नामस्मरण करितां येमें । बाधिजेना ॥ १९ ॥ सहस्रां नामामधे कोणी येक। म्हणता होतसे सार्थक । नाम स्मरतां पुण्यश्लोक । होइजे स्वयं ॥ २० ॥ ... कांहींच न करूनि प्राणी । रामनाम जपे वाणी। .. तेणे संतुष्ट चक्रपाणी। भक्तांलागी सांभाळी ॥ २१ ॥ . नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर। ... माहांदोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥ २२ ॥... अगाध महिमा न बचे बदला । नामें बहुतजन उद्धरला । हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३ ॥ चहूं वर्णा नामाधिकार । नामी नाही लहानथोर । .... जडमूढ पैलपार । पावती नामें ॥ २४ ॥ म्हणोन नाम अखंड स्मरावें । रूप मनी आठवावें । .... तिसरी भक्ती स्वभावें । निरोपिली ॥ २५ ॥ दा. ४. ३.