पान:रामदासवचनामृत.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Fr७] साक्षात्कार. सुख दुःख उद्धेग चिंता । अथवा आनंदरूप असतां। नामस्मरणेंविण सर्वथा। राहोंच नये ॥४॥ हरुषकाळी विषमकाळीं। पर्वकाळी प्रस्तावकाळीं। विश्रांतिकाळी निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥५॥ कोडें सांकडे संकट । नाना संसार खटपट । अवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥६॥ चालता बोलतां धंदा करितां। खातां जेवितां सुखी होता। नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥७॥ संपत्ती अथवा विपत्ती। जैसी पडेल काळगती। नामस्मरणाची स्थिती। सांडूच नये ॥८॥ वैभव सामर्थ्य आणी सत्ता। नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥९॥ आधी आवदसा मग दसा । अथवा दसेउपरी आवदसा । प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥१०॥ नामें संकट नासती । नामें विघ्नं निवारती। नामस्मरणें पाविजेती । उत्तमपदें ॥ १२ ॥ भूत पिशाच्य नाना छंद । ब्रह्मगि हो ब्राह्मणसमंध । मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठं नासती ॥ १२ ॥ नामें विषबाधा हरती। नामें चेडें चेटकें नासती। नामें होये उत्तम गती। अंतकाळी ॥१३॥ बाळपणीं तारुण्यकाळीं। कठिण काळी वृद्धाप्यकाळीं। सर्वकाळी अंतकाळीं । नामस्मरण असावें ॥१४॥ १ पश्चात्ताप. २ अवदशा. ३ ग्रह.