Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
[§४६
रामदासवचनामृत-दासबोध.

पर्वकाळी अतिसादर । वसंतपूजेस तत्पर ।
जयंत्यांची प्रीति थोर । तो सत्वगुण ॥ ७३ ॥
विदेसि[] मेले मरणें । तयास संस्कार देणें ।
अथवा सादर होणें । तो सत्वगुण ॥ ७४ ॥
कोणी येकास मारी । तयास जाऊन वारी ।
जीव बंधनमुक्त करी । तो सत्वगुण ॥ ७५ ॥
लिंगें लाखोली अभिशेष[] । नामस्मरणीं विश्वास ।
देवदर्शनी अवकाश । तो सत्वगुण ॥ ७६ ॥
संत देखोन धांवे । परमसुख हेलावे[]
नमस्कारी सर्वभावें । तो सत्वगुण ॥ ७७ ॥
संतकृपा होय जयास । तेणें उद्धरिला वंश ।
तो ईश्वराचा अंश । सत्वगुणें ॥ ७८ ॥
सन्मार्ग दाखवी जना । जो लावी हरिभजना ।
ज्ञान सिकवी अज्ञाना । तो सत्वगुण ॥ ७९ ॥

दा. २. ७. ९-७९.

४७. नाममहिमा
मागां निरोपिलें कीर्तन । जें सकळांस करी पावन ।
आतां ऐका विष्णोःस्मरण । तिसरी भक्ति ॥ १ ॥
स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें ।
नामस्मरण पावावें । समाधान ॥ २ ॥
नित्यनेम प्रातःकाळीं । माध्यानकाळी सायंकाळीं ।
नामस्मरण सर्वकाळी । करीत जावें ॥ ३ ॥

  1. परदेशांत.
  2. अभिषेक.
  3. डोलतो.