पान:रामदासवचनामृत.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७९ EU sro S६ ] र साक्षात्कार. जयास अहंकार नसे । नैराशता विलसे। जयापासीं कृपा वसे । तो सत्वगुण ॥ ६२॥ सकळांसी नम्र बोले । मर्यादा धरून चाले। सर्वजण तोषविले । तो सत्वगुण ॥ ६३ ॥ सकळ जनासी आर्जव । नाहीं विरोधास ठाव । परोपकारी वेची जीव । तो सत्वगुण ॥ ६४ ॥ आपकार्याहून जीवीं। परकार्यसिद्धी करावी । मरोन कीर्ती उरवावी। तो सत्वगुण ॥ ६५ ॥ पराव्याचे दोषंगुण । दृष्टीस देखे आपण । समुद्रा ऐसी सांठवण । तो सत्वगुण ॥६६॥ नीच उत्तर साहाणे । प्रत्योत्तर न देणे। । आला क्रोध सावरणें । तो सत्वगुण ॥ ६७॥ अन्यायेंवीण गांजिती । नानापरी पीडा करिती। तितुकेंहि सांठवी चित्तीं । तो सत्वगुण ॥ ६८॥ शरीरें घीस साहाणें । दुर्जनासी मिळोन जाणे । निंदकास उपकार करणे । हा सत्वगुण ॥ ६९ ॥ मन भलतीकडे धांवे। तें विवेके आवरावें। इंद्रिये दमन करावें । तो सत्वगुण ॥ ७० ॥ सक्रिया आचरावी । असक्रिया त्यागावी। वाट भक्तीची धरावी । तो सत्वगुण ॥ ७१ ॥ जया आवडे प्रातःस्नान । आवडे पुराणश्रवण। .. नाना मंत्री देवतार्चन । करी तो सत्वगुण ॥ ७२ ॥ आपल्या. २ दोषणाप्रमाणे.