Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
[§४६
रामदासवचनामृत-दासबोध.
शरीर लावावें कारणीं । साक्षेप उठे अंतःकर्णी ॥
सत्वगुणाची करणी । ऐसी असे ॥५१ ॥
शांति क्ष्मा आणि दया । निश्चय उपजे जया ।
सत्वगुण जाणावा तया । अंतरीं आला ॥ ५२ ॥
आले आतीत अभ्यागत । जाऊं नेदी जो भुकिस्त ।
येथानशक्ती दान देत । तो सत्वगुण ॥ ५३ ॥
तडितापडी दैन्यवाणे । आले आश्रमाचेनि गुणें ।
तयालागीं स्थळ देणें । तो सत्वगुण ॥ ५४ ॥
आश्रमी अन्नाची आपदा । परी विमुख नव्हे कदा ।
शक्तिनसार दे सर्वदा । तो सत्वगुण ॥ ५५ ॥
जेणें जिंकिली रसना । तृप्त जयाची वासना ।
जयास नाहीं कामना । तो सत्वगुण ॥ ५६ ॥
होणार तैसें होत जात । प्रपंची जाला आघात ।
डळमळिना ज्याचें चित्त । तो सत्वगुण ॥ ५७ ॥
येका भगवंताकारणें । सर्व सुख सोडिलें जेणें ।
केलें देहाचे सांडणें । तो सत्वगुण ॥ ५८ ॥
विषई धांवे वासना । परी तो कदा डळमळिना ।
ज्याचे धारिष्ट चळेना । तो सत्वगुण ॥ ५९ ॥
देह आपदेनें पीडिला । क्षुधे तृषेनें वोसावला[]
तरी निश्चयो राहिला । तो सत्वगुण ॥ ६० ॥
श्रवण आणी मनन । निजध्यासें समाधान ।
शुद्ध जालें आत्मज्ञान । तो सत्वगुण ॥ ६१ ॥

  1. व्याकुळ झाला.