पान:रामदासवचनामृत.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साक्षात्कार - हरिकथेची अतिप्रीति । सर्वथा नये विकृति। आदिक प्रेमा आदिअंतीं। तो सत्वगुण ॥ ४०॥ मुखीं नाम हाती टाळी । नाचत बोले ब्रीदावळी। घेऊन लावी पायधुळी। तो सत्वगुण ॥४१॥ देहाभिमान गळे । विषई वैराग्य प्रबळे। मिथ्या माया ऐसें कळे । तो सत्वगुण ॥ ४२ ॥ कांहीं करावा उपाये । संसारी गुतोन काये। उकलवी ऐसें हृदये । तो सत्वगुण ॥ ४३ ॥ संसारासी त्रासे मन। कांहीं करावें भजन । ऐसें मनीं उठे ज्ञान । तो सत्वगुण ॥४४॥ असतां आपुले आश्रमी । अत्यादरें नित्यनेमी। सदा प्रीती लागे रामी। तो सत्वगुण ॥ ४५ ॥ सकळांचा आला वीट । परमार्थी जो निकट । आघातीं उपजे धारिष्ट । तो सत्वगुण ॥४६॥ सर्वकाळ उदासीन । नाना भोगी विटे मन। . आठवे भगवद्भजन। तो सत्वगुण ॥ ४७॥ पदार्थी न बैसे चित्त । मनीं आठवे भगवंत।। ऐसा दृढ भावार्थ । तो सत्वगुण ॥ ४८॥ लोक बोलती विकारी। तरी आदिकप्रेमा धरी। निश्चय बाणे अंतरीं । तो सत्वगुण ॥ ४९ ॥ अंतरीं स्फूर्ती स्फुरे । सस्वरूपी तर्क भरे। नष्ट संदेह निवारे । तो सत्वगुण ॥५०॥ . . - - १ अधिक. २ स्वस्वरूप.