पान:रामदासवचनामृत.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ : रामदासवचनामृत-दासबोध. [r६ : देवाकारणे खाद्य । नाना प्रकारी नैवेद्य । .... अपूर्व फळे अर्की सद्य । तो सत्वगुण ॥ २९॥ . ऐसी भक्तीची आवडी। नीच दास्यत्वाची गोडी। स्वयें देवद्वार झाडी। तो सत्वगुण ॥ ३० ॥ "तिथी पर्व मोहोत्साव । तेथें ज्याचा अंतर्भाव। काया वाचा मनें सर्व। अी तो सत्वगुण ॥ ३१॥ हरिकथेसी तत्पर । गधे माळा आणी धुशर। घेऊन उभी निरंतर । तो सत्वगुण ॥ ३२ ॥ ‘नर अथवा नारी । येथानशक्ति सामग्री। घेऊन उभी देवद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३३ ॥ महत्कृत्य सांडून मागें । देवास ये लागवेगें। भक्ति निकट आंतरंगें । तो सत्वगुण ॥ ३४॥ थोरपण सांडून दुरी। नीच कृत्य आंगिकारी। तिष्ठत उभी देवद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३५ ॥ देवालागी उपोषण । वर्जी तांबोल भोजन। नित्य नेम जपध्यान । करी तो सत्वगुण ॥ ३६ ॥ . शब्द कठीण न बोले । अतिनेमेसी चाले। योगी जेणें तोषविले । तो सत्वगुण ॥ ३७॥ सांडूनियां अभिमान । निष्काम करी कीर्तन । श्वेदै रोमांचस्फुरण । तो सत्वगुण ॥ ३८॥ - अंतरी देवाचें ध्यान । तेणें निडारले नयन । पडे देहाचे विस्मरण । तो सत्वगुण ॥ ३९॥ १ बुक्का. २ स्वेद. ३ भरून आले.