पान:रामदासवचनामृत.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत शके १५४२-५४ रामदासांचे टांकळी येथे नदीवर मध्यान्हापर्यंत गायत्री पुरश्चरण, व मध्यान्हानंतर रामजपयज्ञ. रामदासस श्रीरामचंद्राचा साक्षात्कार. शके १५५४-६६ पुरश्चरण संपल्यावर रामदासांनी केलेल्या तीर्थयात्रा. रामदासांनी या अवधीत ज्या तीर्थयात्रा केल्या व जे देश पाहिले त्यांचे वर्णन त्यांनीच थोडेबहुत "तीर्थावळी" या प्रकरणांत करून ठेविलें आहे (विविध विषय, खंड २, पहा.) शके १५६६ ईश्वरी संकेतानुसार रामदास रुष्णातटाकी येऊन हाच देश आपला सांप्रदाय वाढविण्यास योग्य आहे असे समजून तेथे राहिले. शके १५६९ या साली अंगापुरच्या डोहांतून रामाची मूर्ति रामदासांस मिळाली. शके १५७० था मूर्तीची स्थापना त्यांनी चाफळ येथे कृष्णातटाकी आल्यावर चार वर्षांनी केली. ती मूर्ति अद्यापिही पहावयास सांपडते. __शके १५७१ वाकेनिशी प्रकरणाप्रमाणे या साली रामदासांनी शिवाजास चाफळनजीक शिंगणवाडी येथील बागेंत वैशाख शुद्ध ९ गुरुवार या रोजी अनुग्रह दिला. याबद्दल भिन्न मतही आहे, त्याचा पुढे निर्देश करण्यांत येईल. शके १५७१ आषाढमासी रामदास पंढरपुरास विठोबाच्या दर्शनार्थ गेले. त्यावेळेसच त्यांनी विठ्ठल व राम याबद्दलचे आपलें सुंदर पद केले असेल (क्रमांक १३१ ). तुकाराम व रामदासांची तुकारामांच्या निधनापूर्वी भेट झाली होती अशी जी दंतकथा आहे तिचा प्रसंग कदाचित् रामदासांची ही पंढरपुरची यात्राच असेल. तुकाराम शके १५७२ फाल्गुनांत समाधिस्थ झाले. तेव्हां त्यांची व रामदासाची भेट होणे अशक्य दिसत नाहीं. शके १५७२ वाकेनिशी प्रकरणाप्रमाणे या साली रामदास परळीस रहावयास गेले. इतर मताप्रमाणे शिवाजीस राज्याभिषेक झाल्यावर रामदास सज्जनगडावर रहावयास गेले. शके १५७७ या साली शिवाजीने आपले राज्य समर्थांच्या झोळीत टाकिलें. . शके १५७७ समर्थ जांबस आपल्या मातोश्रींचे निधनप्रसंगी अचानक गेले, व त्यांस मातोश्रींचे शेवटचे दर्शन झाले.