पान:रामदासवचनामृत.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ला . . . ... साक्षात्कार. सहस्रभोजने लक्षभोजनें। विविध प्रकारांची दाने । निष्काम करी सत्वगुण । कामना रजोगुण ॥ १८॥ तीर्थी अपी जो अंग्रारें। बांधे वापी सरोवरें। बांधे देवालये सिखरें । तो सत्वगुण ॥१९॥ देवद्वारीं पडशाळा । पाईरीया दीपमाळा। वृंदावनें पार पिंपळा । बांधे तो सत्वगुण ॥ २० ॥.... लावी वनें उपवनें । पुष्पवाटिका जीवनें। .... निववी तापस्यांची मनें । तो सत्वगुण ॥ २१ ॥ . संध्यामठ आणी भुंयेरी। पाईरयिा नदीतीरीं । भांडारगृहें देवद्वारीं। बांधे तो सत्वगुण ॥ २२॥ नाना देवांची जे स्थाने । तेथें नंदादीप घालणें । वाहे आळंकार भूषणें । तो सत्वगुण ॥ २३ ॥. जेंगट मृदांग टाळ । दमामे नगारे काहळ ।। नाना वाद्यांचे कल्लोळ । सुस्वरादिक ॥ २४ ॥ नाना सामग्री सुंदर । देवाळई घाली नर। हरिभजनीं जो तत्पर । तो सत्वगुण ॥ २५ ॥ छेत्रे आणी सुखासनें । दिंड्या पताका निशाणे ।। वाहे चामरें सूर्यपानें । तो सत्वगुण ॥ २६ ॥ वृंदावने तुळसीवनें । रंगमाळा संमार्जनें। ऐसी प्रीति घेतली मनें । तो सत्वगुण ॥ २७॥ सुंदरें नाना उपकरणे। मंडप चांदवे आसनें। देवाळई समर्पणें । हा सत्वगुण ॥ २८॥ १ अप्रहारें. २ धर्मशाळा. २ पायऱ्या. ४ भुयारें. ५ झांगट. F inadi