पान:रामदासवचनामृत.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. [४५. इतर भाविक साबंडे । तयांसहि साधनें मोक्ष जोडे । साधुसंगें तत्काळ उडे । विवेकदृष्टी ॥ ५० ॥ दा. ८.६. ४१-५०. ४६. सत्त्वगुणलक्षण. ईश्वरीं प्रेमा अधिक । प्रपंच संपादणे लोकिक । सदा सन्निध विवेक । तो सत्त्वगुण ॥९॥ संसारदुःख विसरवी। भक्तिमार्ग विमळ दावी। भजनक्रिया उपजवी । तो सत्वगुण ॥ १०॥ परमार्थाची आवडी । उठे भावार्थाची गोडी। परोपकारी तांतडी। तो सत्वगुण ॥ ११॥ स्नान संध्या पुण्यसाळ । अभ्यांतरींचा निर्मळ । शरीरवस्त्रे सोज्वळ । तो सत्वगुण ॥१२॥ येजन आणी याजन । आधेन आणी अध्यापन । स्वयें करी दान पुण्य । तो सत्वगुण ॥१३॥ निरूपणाची आवडी । जया हरिकथेची गोडी। क्रिया पालटे. रोकडी। तो सत्वगुण ॥ १४ ॥ अश्वदानें गजदानें । गादोनें भूमिदानें। नांना रत्नांची दाने । करी तो सत्वगुण ॥ १५॥ धनदान वस्त्रदान । अन्नदान उदकदान। करी ब्राह्मणसंतर्पण । तो सत्वगुण ॥ १६॥ कार्तिकस्नाने माघस्नानें । व्रतें उद्यापर्ने दानें । निष्काम ताथै उपोषणें । तो सत्वगुण ॥१७॥ १ भोळे. २ उठे. ३ अध्ययन.