पान:रामदासवचनामृत.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - - हो . ५] साक्षात्कार. ... लागतां सद्गुरुवचनपंथें । जालें ब्रह्मांड पालथें । तरी जयाच्या शुद्ध भावार्थे । पालट न धरिजे ॥५१॥ . __दा. ५.३. ४७-५१. ४५. मोक्ष कसा मिळतो ? | आतां असो हे उपपत्ती। आशंकेची कोण गती। कितां दिवसां होते मुक्ती । सज्जनाचेनि संगें ॥४१॥ ऐका याचे प्रत्योत्तर । कथेसि व्हावें निरोत्तर। संतसंगाचा विचार । ऐसा असे ॥४२॥ लोहो परिसेसी लागला। थेंबटा सागरी मिळाला। गंगे सरिते संगम जाला । तत्क्षणीं ॥४३ ॥ सावध साक्षपी आणी दक्ष । तयास तत्काळचि मोक्ष । इतरांस तें अलक्ष। लक्षिलें न वचे ॥४४॥ येथे शिष्यप्रज्ञाच केवळ । प्रज्ञावंतां न लगे वेळ। अनन्यास तत्काळ । मोक्ष लाभे ॥४५॥ प्रज्ञावंत आणी अनन्य । तयास नलगे येक क्षण। अनन्य भावार्थेविण । प्रज्ञा खोटी ॥ ४६॥ प्रज्ञविणे अर्थ न कळे । विश्वासेंविण वस्तु नाकळे । ... प्रज्ञाविश्वासें गळे । देहाभिमान ॥४७॥ .. देहाभिमानाचे अंतीं । सहजचि वस्तुप्राप्ती। सत्संगें सद्गती । विलंबचि नाहीं॥४८॥ . . सावध साक्षपी विशेष । प्रज्ञावंत आणी विश्वास । तयास साधनी सायास । करणेचि नलगे ॥४९॥ HTTE . . . १. प्रयत्न करणारा. THE