या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
[§४४
रामदासवचनामृत-दासबोध.
शिष्य असावा स्वतंत्र । शिष्य असावा जगमित्र ।
शिष्य असावा सत्पात्र । सर्वगुणें ॥३१ ॥
शिष्य असावा सद्विद्येचा । शिष्य असावा सद्भावाचा ।
शिष्य असावा अंतरींचा । परम शुद्ध ॥ ३२ ॥
शिष्य नसावा अविवेकी । शिष्य नसावा गर्भसुखी ।
शिष्य असावा संसारदुःखी । संतप्त देहीं ॥ ३३ ॥
जो संसारदुःखें दुःखवला । जो त्रिविधतापे पोळला ।
तोचि अधिकारी जाला । परमार्थविषीं ॥ ३४ ॥
बहु दुःख भोगिले जेणें । तयासीच परमार्थ बाणे ।
संसारदुःखाचेनि गुणें । वैराग्य उपजे ॥ ३५ ॥
जया संसाराचा त्रास । तयासीच उपजे विस्वास ।
विस्वासबळे दृढ कास । धरिली सद्गुरूची ॥ ३६ ॥
दा. ५. ३. १९-३६.
ज्ञानबळे वैभवासी । तृणतुच्छ केलें ॥ ४७ ॥
सद्गुरुकृपेचेनि बळें । अपरोक्षज्ञानाचेनि उसाळे[१] ।
मायेसहित ब्रह्मांड सगळें । दृष्टीस न ये ॥ ४८ ॥
ऐसें सच्छिष्याचे वैभव । सद्गुरुवचनीं दृढ भाव ।
तेणें गुणें देवराव । स्वयेंचि होती ॥ ४९ ॥
अंतरीं अनुतापें तापले । तेणें अंतर शुद्ध जालें ।
पुढे सद्गुवरुचनें निवाले। सच्छिष्य ऐसे ॥ ५० ॥
- ↑ उसाळ्याने.