पान:रामदासवचनामृत.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

br] साक्षात्कार, शिष्य पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारसीळ । शिष्य पाहिजे केवळ । विरक्त अनुतापी ॥२०॥ शिष्य पाहिजे निष्ठावंत । शिष्य पाहिजे सुचिष्मंत । शिष्य पाहिजे नेमस्त । सर्व प्रकारीं ॥ २१ ॥ शिष्य पाहिजे साक्षपी विशेष । शिष्य पाहिजे परम दक्ष । शिष्य पाहिजे अलक्ष । लक्षी ऐसा ॥२२॥ शिष्य पाहिजे अति धीर । शिष्य पाहिजे अति उदार । शिष्य पाहिजे अति तत्पर । परमार्थविषईं ॥ २३॥ शिष्य पाहिजे परोपकारी । शिष्य पाहिजे निर्मत्सरी। शिष्य पाहिजे अर्थातरी । प्रवेशकर्ता ॥ २४ ॥ शिष्य पाहिजे परम शुद्ध । शिष्य पाहिजे परम सावध । शिष्य पाहिजे अगाध । उत्तम गुणाचा ॥ २५ ॥ शिष्य पाहिजे प्रज्ञावंत । शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त। शिष्य पाहिजे नीतिवंत । मर्यादेचा ॥ २६ ॥ शिष्य पाहिजे युक्तिवंत । शिष्य पाहिजे बुद्धिवंत । शिष्य पाहिजे संतासंत । विचारघेता ॥ २७ ॥ शिष्य पाहिजे धारिष्टाचा। शिष्य पाहिजे दृढव्रताचा। शिष्य पाहिजे उत्तम कुळींचा । पुण्यसीळ ॥२८॥ शिष्य असावा सात्त्विक । शिष्य असावा भजक । शिष्य असावा साधक । साधनकर्ता॥ २९॥ शिष्य असावा विश्वासी । शिष्य असावा कायाक्लेशी। शिष्य असावा परमार्थासी । वाढऊं जाणे ॥ ३०॥ . १प्रयत्न करणारा,