या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
[§४१
रामदासवचनामृत-दासबोध.
उत्तम गुणाची मंडळी । सत्यधीर सत्वागळी[१] ।
नित्य सुखाची नव्हाळी[२] । जेथें वसे ॥ २२ ॥
विद्यापात्रे कळापात्रे । विशेष गुणाची सत्पात्रे ।
भगवंताची प्रीतिपात्रे । मिळाली जेथें ॥ २३ ॥
प्रवृत्ती आणी निवृत्ती । प्रपंची आणी परमार्थी ।
गृहस्ताश्रमी वानप्रहस्ती । संन्यासादिक ॥ २४ ॥
वृद्ध तरुण आणी बाळ । पुरुष स्त्रियादिक सकळ ।
अखंड ध्याती तमाळनीळ । अंतर्यामी ॥ २५ ॥
ऐसे परमेश्वराचे जन । त्यांसी माझें अभिवंदन ।
जयांचेनि समाधान । अकस्मात बाणे ॥ २६ ॥
ऐसिये सभेचा गजर । तेथे माझा नमस्कार ।
जेथें नित्य निरंतर । कीर्तन भगवंताचें ॥ २७ ॥
दा. १.८.१-२७
४२. संत चमत्कार करीत नाहीत, देव संतांबद्दल चमत्कार करितो
अवतारादिक ज्ञानी संत । सारासारविचारें मुक्त ।
त्यांचे सामर्थ्य चालत । कोण्या प्रकारें ॥ १ ॥
हे श्रोतयांची आशंका । पाहातां प्रश्न केला निका[३] ।
सावध होऊन ऐका । म्हणे वक्ता ॥ २ ॥
ज्ञानी मुक्त होऊन गेले । मागे त्यांचे सामर्थ्य चाले ।
परंतु ते नाही आले । वासना धरूनी ॥ ३ ॥
लोकांस होतो चमत्कार । लोक मानिती साचार ।
परंतु याचा विचार । पाहिला पाहिजे ॥ ४ ॥
त्यांचे सामर्थ्य चालत । कोण्या प्रकारें ॥ १ ॥
हे श्रोतयांची आशंका । पाहातां प्रश्न केला निका[३] ।
सावध होऊन ऐका । म्हणे वक्ता ॥ २ ॥
ज्ञानी मुक्त होऊन गेले । मागे त्यांचे सामर्थ्य चाले ।
परंतु ते नाही आले । वासना धरूनी ॥ ३ ॥
लोकांस होतो चमत्कार । लोक मानिती साचार ।
परंतु याचा विचार । पाहिला पाहिजे ॥ ४ ॥