पान:रामदासवचनामृत.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१] साक्षात्कार... पुरश्चरणी आणी तपस्वी । तीर्थवासी आणी मनस्वी। माहायोगी आणी जनस्वी । जनसारिखे ॥११॥ ... सिद्ध साधु आणी साधक । मंत्रयंत्रशोधक। येकनिष्ठ उपासक । गुणग्राही ॥ १२ ॥ 'संतसज्जन विद्वज्जन । वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन । प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान । विमळकर्ते॥१३॥ . योगी वित्पन्न ऋषेश्वर ।धूर्त तार्किक कवेश्वर। मनोजयाचे मुनेश्वर । आणी दिग्वल्की ॥१४॥ ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी। तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी। योगाभ्यासी योगज्ञानी। उदासीन ॥१५॥ पंडित आणी पुराणिक । विद्वांस आणी वैदिक । भट आणी पाठक । येजुर्वेदी ॥ १६॥ माहाभले महाश्रोत्री। याज्ञिक आणी आग्नहोत्री। वैद्य आणी पंचाक्षरी । परोपकारकर्ते॥१७॥ भूत भविष्य वर्तमान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान । बहुश्रुत निराभिमान । निरापेक्षी ॥१८॥ शांति मा दयासीळ । पवित्र आणी सत्वशीळ । अंतरशुद्ध ज्ञानसीळ । ईश्वरी पुरुष ॥१९॥ ऐसे जे कां सभानायक। जेथें नित्यानित्यविवेक । त्यांचा महिमा अलोकिक । काय म्हणोनि वर्णावा ॥२०॥ जेथे श्रवणाचा उपाये । आणी परमार्थसमुदाये। तेथें जनासी तरणोपाय । सहजचि होये ॥२१॥ १ ज्ञानी. २ दिगंबर. ३ आमिहोत्री. ४ क्षमा.