या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
[§४१
रामदासवचनामृत-दासबोध.
४१. संतसभावर्णन.
आतां वंदूं सकळ सभा । जये सभेसी मुक्ति सुल्लभा ।
जेथें स्वये जगदीश उभा । तिष्ठतु भरें ॥ १ ॥
"नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ ।
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥ १ ॥"
नाहीं वैकुंठींचा ठाई । नाहीं योगियांचा हृदई ।
माझे भक्त गाती ठाई ठाई। तेथे मी तिष्ठतु नारदा ॥ २ ॥
याकारणें सभा श्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ ।
नामघोषं घडघडाट । जयजयकारें गर्जती ॥ ३ ॥
प्रेमळ भक्तांची गायनें । भगवत्कथा हरिकीर्तनें ।
वेदव्याख्यान पुराणश्रवणें । जेथें निरंतर ॥ ४ ॥
परमेश्वराचे गुणानुवाद । नाना निरूपणाचे संवाद ।
अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेथें ॥ ५ ॥
नाना समाधानें तृप्ति । नाना आशंकानिवृत्ति ।
चित्तीं बैसे ध्यानमूर्ति । वाग्विलासें ॥ ६ ॥
भक्त प्रेमळ भाविक । सभ्य सखोल[१] सात्विक ।
रम्य रसाळ गायक । निष्ठावंत ॥ ७ ॥
कर्मसीळ आचारसीळ । दानसीळ धर्मसीळ ।
सुचिष्मंत पुण्यसीळ । अंतरशुद्ध कृपाळु ॥ ८ ॥
योगी वीतरागी उदास । नेमक निग्रह तापस ।
विरक्त निस्पृह बहुवस । आरण्यवासी ॥ ९ ॥
दंडधारी जटाधारी । नाथपंथी मुद्राधारी ।
येक बाळब्रह्मचारी । योगेश्वर ॥ १० ॥

- ↑ गंभीर.