पान:रामदासवचनामृत.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नतिन Bro] साक्षात्कार. संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ । नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ॥१६॥ संत विश्रांतीची विश्रांती । संत तृप्तीची निजतृप्ती। नातरी भक्तीची फळश्रुती। ते हे संत॥१७॥ संत धर्माचें धर्मक्षेत्र । संत स्वरूपाचे सत्पात्र। नातरी पुण्याची पवित्र । पुण्यभूमी ॥१८॥ संत समाधीचे मंदिर। संत विवेकाचे भांडार। नातरी बोलिजे माहेर । सायोज्यमुक्तीचें ॥१९॥ संत सत्याचा निश्चयो। संत सार्थकाचा जयो। संत प्राप्तीचा समयो। सिद्धरूप ॥२०॥ मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे संत श्रीमंत । जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले ॥ २१ ॥ जे समर्थपणे उदार । जे कां अत्यंत दानशूर। तयांचेनि हा ज्ञानविचार । दिधला नवचे ॥ २२ ॥ महाराजे चक्रवती । जाले आहेत पुढे होती। परंतु कोणी सायोज्यमुक्ती । देणार नाहीं ॥ २३॥ जें त्रैलोकीं नाहीं दान । तें करिती संतसज्जन । तयां संतांचें महिमान । काय म्हणौनि वर्णावें ॥ २४ ॥ जें त्रैलोक्याहूनि वेगळे । जें वेदश्रुतीसी नाकळे । तोच जयांचेनि वोळे । परब्रह्म अंतरीं ॥२५॥ ऐसी संतांची महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा। जयांचनि मुख्य परमात्मा । प्रगट होये ॥ २६ ॥ . . दा.१.५. १ चक्रवर्ती. २ सांपडते.