पान:रामदासवचनामृत.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1 रामदासवचनामृत-दासबोध. [Fro जेथें परीक्षवंत ठकले । नातरी डोळसचि अंध जाले । पाहात असतांचि चुकले । निजवस्तूसी ॥४॥ जें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकाशें गवसेना। नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढें ॥५॥ सोळाकळी पूर्ण शशी । दाखवू सकेना वस्तूसी। तीव्र आदित्य कळाराशी । तोहि दाखवीना ॥६॥ जया सूर्याचेनि प्रकाशें । ऊर्णतंतु तोहि दिसे। नाना सूक्ष्म पदार्थ भासे । अणुरेणादिक ॥७॥ चिरलें वाळाय तेहि प्रकाशी । परी तो दाखविना वस्तूसी। तें जयाचेनि साधकांसी । प्राप्त होये ॥ ८॥ जेथें आक्षेप आटले । जेथें प्रेत्न प्रस्तावले। जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी ॥९॥ वेळे विवेकाची वेगडी । पडे शब्दाची बोबडी। जेथें मनाची तांतडी । कामा नये ॥ १०॥ जो बोलकेपणे विशेष । सहस्त्र मुखांचा जो शेष। तोहि सिणला निःशेष । वस्तु न संगवे ॥११॥ वेदें प्रकाशिले सर्वही । वेद विरहित कांहीं नाहीं। तो वेद कोणासही । दाखऊ सकेना ॥ १२॥ .. तोच वस्तु संतसंगें । रवानुभवें कळों लागे। त्यांचा महिमा वचनी सांगें । ऐसा कवणु ॥ १३ ॥ विचित्र कळा ये मायेची। परी वोळखी न संगवे वस्तूची। मायातीता अनंताची । संत सोये सांगती ॥ १४॥ वस्तूसी वर्णिलें न वचे । तेंचि स्वरूप संतांचें। याकारणे वचनाचें। कार्य नाहीं ॥ १५ ॥ १ लोकरीचा तंतु. २ बालाप्र. 41 .