या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§४० ]
६३
साक्षात्कार.
स्वरूपाचा संयोगी । स्वरूपचि जाला योगी ।
याकारणें वीतरागी । निरंतर ॥ ४८ ॥
स्थिति बाणतां स्वरूपाची । चिंता सोडिली देहाची ।
याकारणे होणाराची । चिंता नसे ॥ ४९ ॥
स्वरूपी लागतां बुद्धी । तुटे अवघी उपाधी ।
याकारणे निरोपाधी । साधुजन ॥ ५० ॥
साधु स्वरूपींच राहे । तेथें संगचि न साहे ।
म्हणोनि साधु तो न पाहे । मानापमान ॥ ५१ ॥
अलक्षास लावी लक्ष । म्हणोनि साधु परमदक्ष ।
वोढू जाणती कैपक्ष[१] । परमार्थाचा ॥ ५२ ॥
स्वरूपी न साहे मळ । म्हणौन साधु तो निर्मळ ।
साधु स्वरूपचि केवळ । म्हणोनियां ॥ ५३ ॥
सकळ धर्मामधे धर्म । स्वरूपी राहणे हा स्वधर्म ।
हेचि जाणिजे मुख्य वर्म । साधुलक्षणाचें ॥ ५४ ॥
दा. ८. ९. १-५४.
४०."जे त्रैलोकी नाही दान । तें करिती संतसज्जन."
आतां वंदीन संतसज्जन । जे परमार्थाचे अधिष्ठान ।
जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं ॥१ ॥
जे वस्तु परम दुल्लभ । जयेचा अलभ्य लाभ ।
तेचि होये सुल्लभ । संतसंगेकरूनी ॥ २२ ॥
वस्तु प्रगटचि असे । पाहातां कोणासीच न दिसे ।
नाना साधनीं सायासें । न पडे ठाई ॥ ३ ॥
जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं ॥१ ॥
जे वस्तु परम दुल्लभ । जयेचा अलभ्य लाभ ।
तेचि होये सुल्लभ । संतसंगेकरूनी ॥ २२ ॥
वस्तु प्रगटचि असे । पाहातां कोणासीच न दिसे ।
नाना साधनीं सायासें । न पडे ठाई ॥ ३ ॥
- ↑ कैवार.