पान:रामदासवचनामृत.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत दासबोध. शोके दुःखवावी वृत्ती। तरी ते जाहाली निवृत्ति। म्हणौनि साधु आदिअंतीं। शोकरहित ॥ ३७॥ मोहे झळंबावे मन । तरी तें जाहाले उन्मन । याकारणे साधुजन । मोहातीत ॥ ३८ ॥ साधु वस्तु अद्वये । तेथे कैंचें वाटेल भये। परब्रह्म तें निर्भये । तोचि साधु ॥ ३९॥ याकारणें भयातीत । साधु निर्भय निवांत। सकळास मांडेल अंत । साधु अनंतरूपी ॥ ४० ॥ सत्यस्वरूपं अमर जाला । भयें कैंचें वाटेल त्याला याकारणे साधुजनाला। भयेचि नाहीं ॥४१॥ जेथें नाहीं द्वंदभेद । आपला आपण अभेद । तेथें कैंचा उठेल खेद । देहबुद्धीचा ॥ ४२ ॥ बुद्धीने नेमिले निर्गुणा । त्यास कोणीच नेईना। याकारणे साधुजना। खेदचि नाहीं ॥ ४३॥ आपण येकला ठाईचा । स्वार्थ करावा कोणाचा। दृश्य नस्तां स्वार्थाचा । ठावचि नाहीं॥४४॥ साधु आपणचि येक । तेथें कैंचा दुःखशोक। दुजेविण अविवेक । येणार नाहीं ॥ ४५ ॥ आशा धरितां परमार्थाची। दुराशा तुटली स्वाथाची । म्हणोन नैराशता साधूची । वोळखण ॥ ४६॥ मृदपणे जैसे गगन । तैसें साधूचे लक्षण । याकारणे साधुवचन । कठीण नाहीं ॥४७॥ १ पछाडावें. २ निश्चय केला.