पान:रामदासवचनामृत.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. . 5३९] . साक्षात्कार. म्हणोनि ते क्रोधरहित । जाणती स्वरूप संत। नासिवंत हे पदार्थ । सांडुनियां ॥ २६॥ । तेथें नाहीं दुसरी परी । क्रोध यावा कोणावरी। क्रोधरहित सचराचरीं। साधुजन वर्तती ॥ २७ ॥ आपुला आपण स्वानंद । कोणावरी करावा मद । याकारणें वादवेवाद । तुटोन गेला ॥२८॥ . साधुस्वरूप निर्विकार । तेथें कैंचा तिरस्कार । आपला आपण मत्सर । कोणावरी करावा ॥ २९॥ साधु वस्तु आनायासें। याकारणें मत्सर नसे। मदमत्सराचें पिसें । साधुसी नाहीं ॥३०॥ साधु स्वरूप स्वयंभ । तेथें कैचा असेल दंभ । जेथे द्वैताचा आरंभ । जालाच नाहीं ॥ ३१॥ जेणे दृश्य केलें विसंच । तयास कैंचा हो प्रपंच। याकारणें निःप्रपंच । साधु जाणावा ॥ ३२॥ अवघे ब्रह्मांड त्याचें घर। पंचभूतिक हा जोजार ।। मिथ्या जाणोन सत्वर । त्याग केला ॥३३॥ याकारणे लोभ नसे । साधु सदा निर्लोभ असे। जयाची वासना समरसे । शुद्धस्वरूपीं ॥ ३४ ॥ आपुला आपण आधवा । स्वार्थ कोणाचा करावा । म्हणोनि साधु तो जाणावा ॥ शोकरहित ॥ ३५॥ दृश्य सांडून नासिवंत । स्वरूप सेविलें शाश्वत। याकारणे शोकरहित । साधु जाणावा ॥ ३६॥ - १ नाहीसं. २ पसारा.