पान:रामदासवचनामृत.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामदासवचनामृत-दासबोध. [३९ मग तो चळतांच अचळ । चंचळपणे निश्चळ। निश्चळ असोन चंचळ । देह त्याचा ॥ १५॥ स्वरूपी स्वरूपचि जाला । मग तो पडोनिच राहिला। अथवा उठोनि पळाला । तरी चळेना ॥ १६ ॥ येथे कारण अंतरस्थिती। अंतरीच पाहिजे निवृत्ती। अंतर लागले भगवंतीं। तोचि साधु ॥ १७॥ बाह्य भलतैसें असावें । परी अंतर स्वरूपी लागावें। लक्षणे दिसती स्वभावें । साधुअंगीं ॥ १८ ॥ रांजी बैसता अवलिळा । आंगीं बाणे राजकळा। स्वरूपी लागतां जिव्हाळा । लक्षणे बाणती ॥ १९॥ येरव्हीं अभ्यास करितां । हाता न चढती सर्वथा। . स्वरूपी राहावें तत्वता । स्वरूप होऊनि ॥२०॥ अभ्यासाचा मुगुटमणी । वृत्ती राहावी निर्गुणीं। संतसंगें निरूपणीं। स्थिती बाणे ॥ २१ ॥ ऐसी लक्षणे बरवीं । स्वरूपाकारें अभ्यासावीं। स्वरूप सोडितां गोसावी। भांबावती॥ २२ ॥ आतां असो हे बोलणें । ऐका साधूची लक्षणे । जेणे समाधान बाणे । साधकाअंगीं ॥२३॥ स्वरूपी भरतां कल्पना । तेथें कैंची उरेल कामना। म्हणोनियां साधुजना । कामचि नाहीं ॥ २४ ॥ कल्पिला विषयो हातींचा जावा । तेणें गुणे क्रोध यावा। साधुजनाचा अक्ष ठेवा । जाणार नाहीं ॥ २५ ॥ । ।। १ राज्यीं. २ सहज. ३ कायमचा.