पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


बळिराजाचा पुनरुत्थानाचा कार्यक्रम


 मा झ्या शेतकरी भावांनो माय बहिणींनो,
 आता तुम्हाला, येथून गेल्यानंतर आजपासून निदान तीन महिन्यांचा कार्यक्रम मी समजावून सांगणार आहे. कारण मला एक धोका दिसतो. त्याची कारणं मी खुल्या अधिवेशनात देत नाही. प्रतिनिधी संमेलनात मी दिली आहेत. निवडणुका झाल्या तर मे महिन्यामध्ये होतील, नाही झाल्या तर डिसेंबरमध्ये होतील. आपण पहिल्यांदा तयारी मे महिन्याची करू. या निवडणुकीची तयारी कशाकरता करायची?
 कर्जमुक्तीच्या आंदोलनामध्ये आपण ठरवलं. कोर्टामध्ये अर्ज टाकायचे. वसली स्थगित करायची आणि वसली स्थगित केल्यानंतर कर्जदार शेतकऱ्यांच्या संख्येच्या ताकदीवरती अशी परिस्थिती तयार करायची की, नवा पंतप्रधान कर्जमुक्ती मानणारा आणि शेतीमालाला रास्त भाव देणाराच असला पाहिजे. हे आपलं धोरण आहे. ही आपली रणनीती आहे. नांदेडला येताना आपण हसत आलो. का तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की, यापुढे शेतकरी संघटनेचा एस्.एस्. हा शिक्का असलेला फॉर्म ज्या ज्या शेतकऱ्यांनी भरला असेल आणि कोर्टात दिला असेल, त्याच्यावर नंबर जरी पडला नसला तरी चालेल, त्या शेतकऱ्याकडनं कोणत्याही प्रकारची वसुली करण्याचा अधिकार कोणत्याही बँकेला नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही घेऊन आलो. केवढा मोठा भाग्याचा दिवस.
 आमचे पणजोबा कर्जात मेले किंबहुना खापरपणजोबासुद्धा कर्जात जन्मले आणि कर्जात मेले. बळिराजा जमिनीत गाडला गेल्यापासून शेतकऱ्याच्या हातात एवढं मोठं हत्यार कधी आलं नव्हतं. वामनाने तीन टांगा टाकून बळीला गाडलं म्हणतात. शेतकऱ्यांचं हे एकच पाऊल इतकं मोठं झालं की काळ्या इंग्रजाला जमिनीत गाडण्याकरता ते पुरेसं आहे. कोणत्याही बंदकीची गरज नाही, हत्याराची गरज नाही. सगळ्या कर्जाच्या बाजातून एक कागद कोर्टाकडे टाकला की

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ३१