पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्या ताकदीचा अंदाज न घेता 'केसरिया' करणाऱ्या रजपुतांच्या रमणींना अखेरी 'जोहार' करावा लागतो.
 लढाईमध्ये जर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला गनिमी काव्याचीच लढाई करावी लागेल. आपली ताकद कठे आहे, शत्रू कमजोर कोठे आहे, त्याला कोणत्या खिंडीत गाठता येईल याचा विचार करूनच आपण आपली लढाई लढायची आहे.
 परभणी अधिवेशनाच्या तीन दिवसांत चर्चा करून आता आपल्या लढाईची वेळ आलेली आहे हे आपण समजून घेतले आहे. आपल्या अनेक पिढ्यांच्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे.
 १९४७ मध्ये गोरा इंग्रज हे राज्य सोडून गेला. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं वाटलं होतं; पण त्याच्या जागी काळा इंग्रज बसला. गोऱ्यांचं जे धोरण, शोषण संपलं असं वाटत होतं ते प्रत्यक्षात संपलं नाही आणि म्हणून १९८४ मध्येसुद्धा महात्मा गांधींचाच हा लढा पुन्हा एकदा देण्याची वेळ आपल्यावर आली आहे.
 १९८० मध्ये कांदा, ऊस या पिकांसाठी आपण आंदोलनं केली. शेतकरी आंदोलन हे मूलतः आर्थिक स्वरूपाचं आहे. ते केवळ झेंडे घेऊन आणि मिरवणुका काढून भागायचे नाही. उसाच्या वेळी आपण बाजारपेठेचा अभ्यास करून ऊस थांबवला पण काही कारणांनी आपली थांबविण्याची ताकद कमी पडते असे दिसताच आपण रास्ता रोको, रेल्वे रोको असे सविनय कायदेभंगाचे मार्ग वापरले. ८१ मध्ये निपाणीला तंबाखूउत्पादक शेतकऱ्यांचे प्रदीर्घ रास्ता रोको आंदोलन झाले. सविनय कायदेभंग करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करण्याचे सोडून शासनाने त्यांच्यावर अमानुष गोळीबार करून शेतकऱ्यांचे बळी घेतले. या दोन्ही वर्षी आंदोलनांमध्ये शेतकऱ्यांना यश मिळाले तरी ते शासनाने टिकू दिले नाही. दध आंदोलनाच्या वेळी तर शासनाने परदेशातून भुकटी आयात करून शेतकऱ्यांचा पराभव केला.
 १९४७ नंतर पुन्हा एकदा क्रांतीची वेळ आलेली आहे. आतापर्यंत आपण वापरलेले सविनय कायदेभंगाचे मार्ग शासनाने नाकारून कर दडपशाहीने आपले आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला कायदेभंगाचा नवीन मार्ग अवलंबिला पाहिजे.
 भारतातले ७५ ते ८०% लोक शेती व्यवसाय करून तव्हेत हेचे उत्पादन करतात. पण आपल्या मालाची किंमत ठरवू शकत नाहीत. पाचपन्नास व्यापारी त्या मालाची किंमत ठरवितात. ही स्थिती उलटली पाहिजे. ते करणंही सोपं

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २६