पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/११८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दृष्ट्या काही अपंग, दुर्बल असणारं हे गृहीत धरले आहे. अशा अपंग आणि दुर्बल लोकांची काही प्रमाणात व्यवस्था करणे ही जबाबदारी समाजाची आहे यात काही शंका नाही. ही जबाबदारी कोणत्या पद्धतीने घेतली जावी, हे काम कुणाचं आहे हे ठरणं महत्त्वाचं आहे. कल्याणकारी राज्य म्हणून गरिबी दूर करतो म्हणणारांनी गरिबी वाढवली, स्वतःचे खिसे भरले. समाजातील गरिब, दुर्बल लोकांची जबाबदारी उचलण्याची आपल्या देशात अस्तित्वात असलेली सर्वांत उत्तम, आदर्श व्यवस्था म्हणजे 'गुरुद्वारांतील लंगर' होय. कुठेही शीख माणूस तुम्हाला भीक मागतांना दिसत नाही. कारण तो त्याला झेपेल तो धंदा सुरू करू शकतो, उद्योजकतेत फसला तर त्याच्यावर उपाशी मरायची वेळ येत नाही, आठ दिवस त्याची गुरुद्वारात सोय होते, तो दुसऱ्या उद्योगाचा विचार करू शकतो. अहिल्याबाई होळकरसुद्धा अपंग, कमकुवत व कमजोर वर्गाच्या कल्याणाचा कार्यक्रम राबविण्यात आदर्श मानता येतील.
 व्यक्ती तितक्या प्रेरणा
 पण, अपंगांना, दुर्बलांनासुद्धा अर्थव्यवस्थेत स्थान मिळालं पाहिजे म्हणून अर्थव्यवस्था बिघडली तर कसं होतं? ऑलिपिंक स्पर्धांमध्ये सुदृढांच्या बरोबरीने अपंगांनाही भाग घेता यावा म्हणून सुदृढांवर बंधनं घालणारं नियोजन झालं तर काय होईल? तेच अर्थव्यवस्थेचं होणार. अपंग आणि कमजोर घटकांची काळजी हा अर्थव्यवस्थेचा विषय नाही. माणसात काही एकच प्रेरणा असत नाही, त्याच्या वेगवेगळ्या प्रेरणा असतात. तसंच, समाजाच्याही वेगवेगळ्या प्रेरणा आहेत. त्यांतील अर्थप्रेरणा ही महत्त्वाची आहे. अर्थप्रेरणेखेरीज राजसत्ता चालवणारांची, दंडा चालविणारांची एक प्रेरणा वेगळी आहे. कोणाला तरी मदत करण्याचीही एक वेगळी प्रेरणा असते. एखादं मूल मरणाच्या पायरीवर पडलं आहे, ओकारीनं, घाणीनं बरबटलेलं आहे, आपल्याला त्याला हात लावणेसुद्धा नको वाटते पण अशा परिस्थितीतसुद्धा त्या मुलाला वात्सल्यानं उचलून त्याला बरं करण्याचा प्रयत्न करणं, किमान त्याच्या यातना कमी करण्याचा प्रयत्न करणं, अशीही माणसांची एक प्रेरणा असते. अगदी, 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' म्हणून आळसात पडून राहण्याचीही प्रेरणा असू शकते. कारण माणसा-माणसांच्या प्रेरणाच इतक्या विभिन्न आहेत.
 पण, कोणत्याही स्थितीत अपंगांची काळजी हा विषय अर्थप्रेरणेवर चालणाऱ्या व्यवस्थांचा असूच शकत नाही. तो करुणेवर आधारलेल्या संस्थांचा, करुणा शब्द वापरायचा नसेल तर त्यासाठी तयार झालेल्या वेगळ्या संस्थांचा असला पाहिजे. गरिबाचं नाव घेऊन राजकीय सत्ता हातात ठेवणारांनी आर्थिक सत्ताही

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ११८