पान:महाबळेश्वर.djvu/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ५९ )



दोस्त होऊन जातात. लिली, लारेल, कौझलिप, डेलिया, डेझी वगैरे विलायती झाडाचे खुंट जमिनींत जगून राहिले तर मोठे भाग्य ! अशा वेळी बंगल्यांचे माळीलोक, देवस्थानचे भटभिक्षुक, दहा पांच वाणी उदमी, दारू विके, एक दोन पारशी, व धावड, कुणबी, धनगर, मिळून सारे हजार लोक येथें डोके देऊन राहतात. जुलई महिन्यांत मात्र पाऊस अगदीं मुसळधारांनी ओतावयास लागतो. तेव्हां रोजचा पाऊस कधीं कधीं १२ पासून १८ इंच पावेतों होतों. सर्व झ-यांना पाण्याचे लोंढे वाहूं लागतात. यामुळे रस्ते व बगीचे यांचें अगदीं नुकसान होऊन जाते. या देिवसांत जिकडे पहावें तिकडे डोंगरावर, रस्त्यावर, आणि रानांतून पाणीच पाणी झालेलें असतें; व पृथ्वीची चर्या आनंदानें अगदी तल्लीन होऊन शांत झालेली दिसते.

हवेचे गुण.

 येथील हवेमध्यें साधारण गुण असा आहे कीं, तिचे योगानें निरोगी मनुष्याची प्रकृति सतेज राहून त्याचे अंगांत सदोदित हुषारी असते. असें होण्याचीं कारणें अशीं आहेत:-