पान:महाबळेश्वर.djvu/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६० )

  ( १ ) या हवेमध्यें थंडी फार आहे. ती फार असण्याचें कारण उघडच आहे. एक तर गांव सह्यपर्वताचे एका उंच शिखरावर वसला आहे. वृक्ष, वनस्पति सदोदित दाट, सच्छाय व हिरव्या असल्यामुळे सूर्याची प्रखरता त्याच्या अंतरंगांत शिरतच नाहीं. शिवाय कृष्णा आदिकरून नद्यांची उत्पति या डोंगरांतून असल्यामुळे त्यांचें पाणी चहूंकडे पहाडांत खेळत राहिलेले आहे. तसेंच वरचेवर मेघपटलें येऊन सूर्याच्या उष्णतेचें निराकरण होत असतें. या सर्व गोष्टींमुळे उन्हाळ्यामध्यें उष्णतेपासून बाहेरगांवी मनुष्यमात्रास जे विकार होतात, ते येथें होत नाहींत. म्हणून उष्णता शमन होण्याकरितां कृतीनें गार केलेलें पाणी पिण्याची किंवा कृत्रिम शितोपचारांची येथें जरूरच लागत नाहीं. तेव्हां अर्थातच कृत्रिम शीतजल, कृत्रिम वायु, इत्यादिकांपासून पुढें जे वाईट परिणाम होतात, ते येथें राहिल्यापासून होण्याची तिळप्राय धास्ती नाहीं.

 (२) येथील हवा सुखावह असण्याचें दुसरे कारण हें आहे कीं, ही हवा इतकी थंड आहे तथापेि तिच्यांत स्निग्धता विशेष आहे. येथें हवा हिंवाळ्यांत