पान:महाबळेश्वर.djvu/93

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ५८ )र्यंत लांब लांब गवताच्या व पानाच्या जाड ताटयांनीं कुडून टाकितात. आणि ज्या दिशेनें फारच थोडा वारा किंवा धुकें घरांत भरण्याचा संभव असेल अशा ठिकाणींं एक लहानसें गवाक्ष ठेऊन पावसाळ्यांत त्या वाटेनें नडलेल्या कामासाठी बाहेर पडतात व आंत परत जातात. साहेब लोकांची छावणी उठली, आणि ते डोंगराखालों उतरले, म्हणजे त्यांचे माळी बागेतल्या कुंडयांतील झाडे काढून टाकतात. आणि त्यांतील माती एखाद्या कोप-यांत रचून ठेवून व तीवर पाल्यापाचोळ्याची शाकारणी करून बंगल्याच्या व्हरांडयांत उर्फ पडव्यांत कुंड्यांच्या रांगा लाऊन ठेवितात. बंगल्यांच्या आसपासची माती व सडका अगदीं नाहीशा होऊं नयेत म्हणून त्यांवर झाडाचा पाला दाबून बसविण्याची चाल आहे. पावसाळ्यास आरंभ होऊन आठ पंधरा दिवस झाले कीं जांभळी शिवाय करून इतर झाडावर एक पान किंवा फूल दिसेल तर शपथ ! साहेब लोकांच्या बंगल्या समोरच्या बागांतील दिखाऊ, पण वासानें आणि सामर्थ्याने अगर्दी नादान फुलझाडें तर एक दोन सरी बरोबरच जमिन-