पान:महाबळेश्वर.djvu/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ५७ )



ठिकाणीं दोन तीन महिन्याच्या अवकाशांत तीनशेंपासून चारशें इंच पाऊस पडतो, त्या ठिकाणच्या पावसाळ्याची कल्पना करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षां तो फार जंगी असेल असें मानून स्वस्थ राहणें बरें दिसतें. मे महिन्याच्या दहाव्या बाराव्या तारखेपासून येथील ग्रामस्थ लोक या स्वारीच्या आगमनसत्काराच्या तयारीस लागतात; व जूनच्या दहावे तारखेपयंत बहुतकरून सगळे सज्ज झालेले असतात; मुख्य तयारी धान्य व लांकडे घेऊन ठेवण्याची. महाबळेश्वरीं जळाऊ लांकडे सामान्य ऋतूंत पुष्कळ सवंग मिळतात खरीं, पण पावसाळ्यांत दसपट किंमत दिली तरी तीं मेिळणार कशीं ? व मिळाली तर तीं जळणार कशीं ? तेव्हां प्रथम चरू आणि इंधन यांचा पुरेसा सांठा केल्यावर, ज्या घरांत हा भयंकर पावसाळा काढावयाचा, त्याचा तरणोपाय कसा लागेल, हें पहावें लागतें ! पावसाच्या संतत धारेनें घराच्या भिंती वाहून जाऊं नयेत. व बुरशानें व शेवाळीनें त्यांची नासाडी होऊं नये म्हणून येथील लोक आपलीं घरे मागल्या दारापासून पुढल्या दारापर्यंत, व आढ्यापासून जात्याप-