पान:महाबळेश्वर.djvu/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ५६ )



सकाळीं हातपाय गळून जाणें, यत्किंचित श्रम झाले असतां अंगास घाम सुटणें, एकसारख्या उत्सुकतेनें काम करीत बसण्याची ताकद नसणें, वगैरे ऊष्ण हवेच्या भावना ज्या कोणास झालेल्या असतील त्यास येथें आल्याबरोबर रामबाण औषध मिळून तो मनुष्य कसा अगदीं ताजातवाना बनतेा. मे महिन्यांत येथे कधीं कधीं पावसाच्या सरी येऊन विजा व गारा यांचें तुफान वावटळच होतें. त्यामुळे हवेत ओलसरपणा अधिक अधिक प्रमाणाने येऊं लागतो. ढग व धुक्याने वारंवार सर्व खोरीं भरून जाऊन दिसेनाशीं होतात. आणि जसजसा दिवस वर येऊन उन्हाची ताप पडते, तसतसे ते ढग व धुकें यांची जी तारंबळ उडते ती पाहण्याची मोठी मेोज असते. उन्हाने त्याचें लहान लहान तुकडे तुकडे होऊन जसा कांहीं नाच चालला आहे कीं काय असें दिसतें. असें होऊन ते देखावा अगर्दी स्वप्नासारखा वाटतो. सिलोनमध्यें पाऊसकाळ सुरू झाल्यापासून सुमारें १९|२० दिवसांनीं येथें त्याची टाकी चालू होतेच. ज्येष्ठमासीं मृगनक्षत्रापासून पावसाळा लागतो असें ह्मणतात तोच हा होय. ज्या-